#Video बायकोशी भांडण तरुणाने गाठली थेट सासुरवाडी अन् विद्युत टॉवरवर जाऊन केला ‘स्टंट’

जालना – बायकोशी झालेल्या भांडणातून एका तरुणाने थेट उच्च दाबाच्या विद्युत टॉवरवर जाऊन स्टंट केल्याचा प्रकार घडला आहे. जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यात ही घटना घडली आहे. ही स्टंट बाजी या तरुणाने त्याच्या सासरी केली असून यामुळे चांगलीच खळबळ उडाली.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/1412360159119406

मंगेश शेळके असे या तरुणाचे नाव असून जाफराबाद तालुक्यात सोनखेडा-भराडखेडा हा प्रकार घडला आहे. या तरुणाने नशेत हे कृत्य केल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आले आहे.

मंगेश आपल्या सासुरवाडीतील विजेच्या टॉवरवर चढला असता त्याला टॉवर वरून खाली उतरवण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण तो खाली उतरण्यास तयार नव्हता. शेवटी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली दरम्यान चार समजूत घालत तासांनंतर मंगेश खाली उतरवला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.