Fuel Shortage : राज्यात इंधन टंचाईचे संकट अधिक गडद होत असताना खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. जालना प्रशासनाने कॅनमध्ये डिझेल देण्यावरील बंदी मागे घेतली असून आता ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि इतर कृषी यंत्रांसाठी कॅनमध्ये डिझेल मिळणार आहे. (Fuel Shortage) खरीप हंगामासाठी मशागत, नांगरणी आणि पेरणीपूर्व कामांची लगबग सुरू असताना अचानक लागू करण्यात आलेल्या बंदीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. अनेकांना ट्रॅक्टर थेट पेट्रोल पंपावर न्यावे लागत होते. गावांपासून पंप दूर असल्याने वेळ, अतिरिक्त इंधन आणि मजुरीचा खर्च वाढत होता. परिणामी शेतीची कामे रखडली होती. (Fuel Shortage) कॅन बंदीनंतर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टर आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरातील पंपांवर शेतकऱ्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत होती. या परिस्थितीमुळे प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत होती. (Fuel Shortage) शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेऊन प्रशासनाने अवघ्या दोन दिवसांत निर्णय बदलला आणि कॅनमध्ये डिझेल देण्यास पुन्हा परवानगी दिली. मात्र, इंधनाचा गैरवापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी काही कठोर अटी लागू करण्यात आल्या आहेत. (Fuel Shortage) डिझेल खरेदीसाठी आवश्यक अटी ट्रॅक्टरचे आरसी बुक आवश्यक अॅग्रीस्टॅक आयडी सादर करणे बंधनकारक अॅग्रीस्टॅक नसल्यास स्वतंत्र नोंदवहीत माहिती नोंदवली जाणार आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि स्वाक्षरी अनिवार्य पेट्रोल पंप चालकांनी सर्व नोंदी ठेवणे बंधनकारक प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, कॅनमधील डिझेलचा गैरवापर किंवा अनधिकृत विक्री आढळल्यास संबंधित पेट्रोल पंप चालकांवर अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. (Fuel Shortage) शेतकऱ्यांना कोणतीही अडचण आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 02482-225311 किंवा 8888125312 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Fuel Shortage)