जालन्यामध्ये स्टील कंपनीमध्ये भीषण स्फोट; 20 जण जखमी
Updated On:

जालना : जालन्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये भयंकर स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटाने संपूर्ण एमआयडीसी हादरली आहे. कज केसरी या स्टील कंपनीत दुपारच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला.
काय घडले नेमके?
हा स्फोट एवढा भीषण होता कि यामध्ये दहा ते बारा जणांचा मृत्यू झाला तसेच 20 ते 25 जण गंभीर रित्या भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. या अपघतातील जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनस्थळाची पाहणी केली. हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





