Jalgaon News : जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून, पाचोरा शहरात उष्माघाताने एका फळ विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आनंदा भोई असे या मृत विक्रेत्याचे नाव असून, त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काय घडले नेमके? मिळालेल्या माहितीनुसार, आनंदा भोई हे पाचोरा (Jalgaon News) शहरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दररोज फळ विक्रीचा व्यवसाय करत असत. सध्या जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ ते ४४ अंशांच्या वर पोहोचला असून, रणरणत्या उन्हात ते दिवसभर आपला व्यवसाय करत होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे फळ विक्री करून ते घरी परतले. Jalgaon News मात्र, घरी पोहोचल्यानंतर त्यांना अचानक शारीरिक त्रास जाणवू लागला. त्यांना तीव्र चक्कर येऊन उलट्यांचा त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात (Jalgaon News) हलवले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उष्माघाताचा वाढता धोका जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठला आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाच्या झळा प्रचंड प्रमाणात जाणवत आहेत. उष्माघातामुळे झालेला हा मृत्यू प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरत असून, नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.