जळगाव – क्रूझर गाडी पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात जळगाव जिल्ह्यातील हिरापूर तालुका चाळीसगाव येथे घडला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी जाऊन बचाव कार्य केले.
नाना भास्कर कोळी, विकास जलाल तडवी आणि मुक्तार तडवी अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अनीस तडवी, चंदन हरीश पाटील, माधान नारायण पाटील, नितीन बाळू पाटील, दिलीप शबीर तडवी, समीर राजू तडवी, स्वराज्य स्वप्नील पाटील अशी जखमींची नावे आहेत. या अपघात जखमी झालेल्यांना धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमीपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही कामगार क्रूझर गाडी MH 13 AC 5604 या वाहनातून काम करण्यासाठी डोंगरगाव येथून मनमाडला गेले होते. काम करून घरी परतत असताना रात्री दहाच्या सुमारास चाळीसगाव- नांदगाव रस्त्यावरील हिरापूर गावाजवळ क्रूझर अचानक घसरली. गाडी वेगात असल्याने क्रूझर गाडी रस्त्यावर आदळली आणि मोठी दुर्घटना घडली.