Jalgaon Accident | जळगाव येथील परंडा स्थानकाजवळ भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर 25 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. पुष्पक एक्स्प्रेसच्या एका कोचमध्ये स्पार्क झाला होता. ब्रेक किंवा गरम एक्सेल यांच्यामुळे स्पार्क झाला असावा. यामुळे काही प्रवाशी घाबरले. त्यांनी रेल्वेची चेन ओढली आणि त्यांनी खाली उड्या मारल्या.
तेव्हा पलीकडून येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसने लोकांना चिरडले. रेल्वे अपघातातील बहुतांश मृत प्रवासी परप्रांतीय होती. मृत्युमुखी पडलेले सर्व प्रवाशी हे उत्तर भारतातील आहेत तर तीन जण नेपाळमधील आहे.
पुष्पक एक्सप्रेसमधून धूर येण्यामागचे कारण काय?
बऱ्याच वेळा धूर ट्रेनखालून बाहेर येताना दिसतो. यामागे अनेक कारणे असू शकतात. सामान्यतः हा धूर इंजिनच्या उष्णतेमुळे देखील बाहेर येऊ शकतो. सतत धावल्यामुळे ट्रेनची चाके गरम होतात आणि काही वेळा ठिणग्या निघतात, त्यामुळे धूर तयार होतो. तसेच, ब्रेक लावल्याने किंवा इतर कोणत्याही कारणामुळे धूर दिसून येतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी हा धूर आग समजला आणि जीव वाचवण्यासाठी धावाधाव सुरू झाली. Jalgaon Accident |
याआधी देखील घडल्या अशा घटना
सीमांचल एक्स्प्रेसच्या चाकांमधून ठिणग्या आणि धूर निघत असताना अशी घटना उघडकीस आली होती. यावेळीही लोक घाबरले आणि ट्रेनमधून उतरू लागले, मात्र यादरम्यान समोरून एकही ट्रेन येत नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ट्रेनच्या चाकांमध्ये जास्त उष्णता निर्माण झाल्यामुळे हा प्रकार घडला. Jalgaon Accident |
याशिवाय तीन वर्षांपूर्वी सोमनाथ-जबलपूर एक्स्प्रेसमध्येही असाच प्रकार घडला होता. यामध्ये प्रवाशांना अचानक ट्रेनखाली धूर येताना दिसला, ज्याची माहिती तात्काळ रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आली, त्यानंतर लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक लावला. त्यावेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली आणि आग विझवण्यात आल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. तर ही आग ब्रेक ब्लॉकिंग जॅममुळे लागली असल्याचे समोर आले होते. Jalgaon Accident |
हेही वाचा: