जळगांव – नेहमीप्रमाणे शाळेतून घरी जात असताना आई आणि दहा वर्षाच्या चिमुकल्याचा अपघाता दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात आज (गुरूवारी) सकाळी घडला आहे. कविता कृष्णकांत चौधरी (वय-35, विद्यानगर, एरंडोल), मुलगा लावण्य चौधरी (वय-10) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या आई व मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कविता चौधरी या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका होत्या. त्या नेहमी मुलगा लावण्यला सोबत शाळेत घेऊन जात असत. आज नेहमीप्रमाणे शाळेतून घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीचा आणि ट्रकचा अपघात झाला. भीषण अपघातात ट्रकच्या चाकाखाली आल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर अपघाताचे दृश्य पाहून अनेकांच्या अंगात थरकाप उडाला.
अपघाताची माहिती मिळताच, एरंडोल पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. नागरिकांच्या मदतीने मृतदेह जळगाव जिल्हा रूग्णालायात हलविण्यात आले होते. एकाचवेळी आई व चिमुकल्यावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.