अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देण्यास मुकणार जेटली

न्यूयॉर्क : संसदेतील अंतरिम अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देण्यास मुकणार असल्याचे संकेत केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी दिले आहेत. वैद्यकीय उपचारासाठी सध्या ते अमेरिकेतील रूग्णालयात दाखल आहेत.

मोदी सरकारने आपला अंतिम आणि सहावा अर्थसंकल्प शुक्रवारी संसदेत सादर केला. ती जबाबदारी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी पार पाडली. जेटली यांच्या अनुपस्थितीमुळे गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याच्या दिवशी 66 वर्षीय जेटली यांनी लवकरच भारतात परतण्याचे सूतोवाच केले. त्यामुळे अर्थसंकल्पावरील चर्चेला ते उत्तर देतील, असे मानले जात होते.

मात्र, रविवारी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी बहुधा गोयलच अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतील, असे म्हटले. माझ्यावरील उपचाराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, डॉक्‍टरांच्या परवानगीवर माझे मायदेशी परतणे अवलंबून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. याआधी मागील वर्षी मेमध्ये जेटली शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेला गेले होते. त्यावेळीही अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला होता. दरम्यान, उपचारासाठी अमेरिकेत असले तरी जेटली सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने विविध मुद्‌द्‌यांवर त्यांची भूमिका मांडत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)