अंबानींच्या घरासमोरील स्फोटकांची जबाबदारी ‘जैश-उल-हिंद’ने स्वीकारली

मुंबई,  – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर तीन दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली कार आढळली होती. या कारची जबाबदारी जैश-उल-हिंद या संघटनेने स्वीकारली आहे. ही नवीनच संघटना असल्याने याबाबत अधिक माहिती समजू शकली नाही.
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाबाहेरची स्फोटकांनी भरलेली कार फक्त एक ट्रेलर आहे. मोठे चित्र अजून समोर यायचे आहे, असे जैश-उल-हिंदने टेलिग्राम ऍपवरील संदेशात म्हटले आहे. अंबानी यांच्या घराजवळ कार सोडणारा सुरक्षित ठिकाणी पोहोचला आहे. हा फक्त एक ट्रेलर होता. अजून मोठे चित्र समोर यायचे आहे, असे जैश-उल-हिंदने म्हटले आहे.

जैश-उल-हिंदने बिटकॉईनच्या स्वरुपात पैसा मागितला आहे. तसेच तुम्हाला जमत असेल तर आम्हाला थांबवून दाखवा, असे तपास यंत्रणांना आव्हान देण्यात आले आहे. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर तुमच्या मुलांच्या कारला एसयुव्हीची धडक बसेल, अशी धमकी सुद्धा या मेसेजमध्ये देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.