जैश-ए-मोहम्मचा अतिरेक्याला दिल्लीतून अटक

पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आणखी एक आरोपीला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सज्जाद खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो दिल्लीत कपडे विकणारा असल्याचा बनाव करून राहत होता. दिल्ली स्पेशल सेलने आरोपी सज्जाद खान याला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सज्जाद खान हा नुकतंच मारला गेलेल्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा मुद्दसिर याचाच साथीदार आहे.

तत्पूर्वी, दक्षिण काश्‍मीरात त्राल भागात  झालेल्या चकमकीत जे तीन दहशतवादी ठार झाले त्यात  पुलवामातील दहशतवादी हल्ल्यातील  मास्टर माईंड मुदासिर अहमद खान उर्फ मोहद भाई याचाही समावेश असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. मुदासिर खान हा 23 वर्षीय दहशतवादी असून तो पुलवामाचाच रहिवासी होता व तो पदवीधर आहे. तो मधल्या काही काळात इलेक्‍ट्रेशियन म्हणून काम करीत होता. त्यानेच पुलवामा हल्ल्यासाठी स्फोटके आणि वाहनांची व्यवस्था केल्याचे लक्षात आले आहे. तो सन 2017 मध्ये जैश ए महंमद मध्ये दाखल झाला होता. नूर महंमद तंत्री उर्फ नूर त्राली याने त्याला जैश ए महंमद मध्ये आणण्याचे काम केले. त्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये तंत्री हा चकमकीत ठार झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.