नवी दिल्ली – पोलिसांनी पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवादी मदतनीसांना शस्त्रांसह अटक केली आहे. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी या यशाबद्दल सुरक्षा दलांचे अभिनंदन केले आहे. पुलवामा पोलिस, 55 राष्ट्रीय रायफल्स आणि 182-183 बटालियन सीआरपीएफने ऑपरेशन सुरू केले आणि मदतनीसांना अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले तीन्ही मदतनीस जिल्ह्यात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांसाठी राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करत असत. यासोबतच त्यांच्या प्रवासाच्या व्यवस्थेसह अन्य प्रकारच्या सुविधाही ते देत असत. त्यांच्याकडून एक एके 47 रायफल, तीन मॅगझिन आणि 69 गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, जांडवाल येथील ओवेस अल्ताफ, गुदुरा येथील आकिब मंजूर आणि करीमाबाद येथील वसीम अहमद पंडित अशी अटक करण्यात आलेल्या तीन मदतनीसांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या मदतनीसांची चौकशी करण्यात येत आहे.