जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलही यंदा ऑनलाईनच

आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनाला नामांकितांची उपस्थिती

जयपूर – येथील डिग्गी पॅलेसमध्ये प्रतिवर्षी होणारा जयपूर लिटरेचर फेस्टीवल यावर्षी ऑनलाईन स्वरुपात होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामध्ये यावर्षीही जगभरातील नामांकित साहित्यिक सहभागी होणार आहेत. प्रतिवर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पाच दिवसांसाठी होणारा हा साहित्य सोहळा यावर्षी फेब्रुवारी 19 ते 28 दरम्यान, दहा दिवसांसाठी ऑनलाईन स्वरुपात साजरा होणार असल्याचे संयोजक नमिता गोखले यांनी कळवले आहे. “पृथ्वीवरील सर्वात मोठे साहित्य संमेलन’ अशी ओळख असलेल्या या संमेलनाचे हे 14 वे वर्ष आहे.

वर्ष 2020 चे बुकर पारितोषिक विजेते डग्लस स्टुअर्ट यांच्या कादंबवरील चर्चा या संमेलनात होईल. तसेच अमेरिकन लेखक नोआम चोमास्की, ब्रिटीश लेखिका मरीना व्हीलर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार करण थापर, कॉंग्रेस नेते शशी थरूर, नाटककार किश्‍वर देसाई तसेच विज्ञानलेखिका प्रियंवदा नटराजन अशा अनेक नामांकितांचा विविध चर्चासत्रात सहभाग असणार आहे.

फेस्टीव्हल डायरेक्‍टर संजय रॉय म्हणाले की, कोव्हिड-19 च्या युरोप, अमेरिकेतील सध्याच्या प्रकोपामुळे यावर्षी पूर्ण स्वरुपातला सोहळा साजरा करता येत नसला, तरी आम्ही अपेक्षा करतो की पुढील वर्षी पूर्वीच्याच जोमाने हा शब्दांचा उत्सव साजरा करता येईल. याशिवाय गेले काही महिने आम्ही घेत असलेल्या युट्युबवरील चर्चासत्रांना साहित्यप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

जगभरातील 27 हून अधिक भाषांमधील 65 हून अधिक देशांतील 400 अधिक साहित्यिकांना 350 चर्चासत्रांमधून ऐकण्याची, भेटण्याची संधी या फेस्टीव्हलमधून मिळत असते आणि प्रतिवर्षी पाच लाखांहून अधिक साहित्यप्रेमी या संमेलनात प्रत्यक्ष उपस्थित असतात. म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात मोठा साहित्यसोहळा असे याचे सार्थ वर्णन केले जाते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.