प्रो कबड्डी स्पर्धा : जयपूरचा यु मुंबा संघावर विजय

हैदराबाद – पूर्वार्धातच भक्कम आघाडी घेणाऱ्या जयपूर पिंकपॅंथर्स संघाने यु मुंबा संघावर 42-23 अशी सहज मात करीत प्रो कबड्डी लीगमध्ये धडाकेबाज सलामी केली. गचीबावली स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत जयपूरने मध्यंतराला 22-9 अशी आघाडी घेत सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकविले होते. त्यांच्या खेळाडूंनी पल्लेदार चढाया व अचूक पकडी असा खेळ करीत खेळावर नियंत्रण घेतले होते. उत्तरार्धातही त्यांनी आघाडी शेवटपर्यंत टिकविताना चतुरस्त्र खेळाचा प्रत्यय घडविला. यु मुंबाच्या खेळाडूंना चढायांवर नियंत्रण ठेवता आले नाही. तसेच त्यांच्या खेळाडूंनी पकडी करताना चुका करीत हाराकिरी केली.

जयपूरच्या विजयात दीपक हुडा (11 गुण), नितीन रावळ (7 गुण) व अमितकुमार (5 गुण) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. हुडा याने या स्पर्धेच्या इतिहासात एकाच सामन्यात दहा किंवा त्याहून अधिक गुण नोंदविण्याचा 25 वेळा पराक्रम केला आहे. मुंबा संघाकडून अभिषेकसिंग (7 गुण ) व दोंग जिओन ली (6 गुण ) यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य खेळाडूंनी सपशेल निराशा केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)