जायंट पांडाविषयी अभ्यास करण्याची संधी

पुणे : पर्यावरण कृतीमोहिमेच्या माध्यमातून चीनमधील “जायंट पांडा’चा अभ्यास करण्याची संधी युवकांना मिळणार आहे. तेर पॉलिसी सेंटर आणि चीनमधील ऑपरेशन अर्थ यांच्या वतीने “भारत-चीन पर्यावरण मैत्री संघटन’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, या अंतर्गत 18 ते 21 वयोगटातील तीन मुलांना चीन येथे जाऊन जायंट पांडाविषयी अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती तेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष राजेंद्र शेंडे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

शेंडे म्हणाले, “चीनमधील पांडा संवर्धनाचे कार्य आणि भारतातील व्याघ्रप्रकल्पांतर्गत होणारे कार्य या दोन्हींमध्ये बरेच साधर्म्य आहे. येथील व्याघ्र प्रकल्पांचा अभ्यास करण्याची संधी युवकांना उपलब्ध होणे सहज शक्‍य आहे. मात्र चीनमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि पारंपरिक अभ्यासाच्या माध्यमातून पशुसंवर्धनाचे कार्य कसे होते? आणि त्याचा भारताच्या संवर्धन कार्यात कसा उपयोग करता येईल, याबाबत माहिती घेण्याची संधी युवकांना या माध्यमातून घेता येणार आहे. यासाठी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर 31 जुलैपर्यंत नोंदणी करणे आवश्‍यक आहे. निवड प्रक्रियेद्वारे या तीन मुलांची निवड केली जाणार आहे. तसेच या अभ्यास दौऱ्याचा संपूर्ण खर्च हा संस्थेतर्फे केला जाणार आहे. याबाबत अधिक माहिती संकेतस्थाळावर उपलब्ध आहे.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)