Walmik Karad | मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील 6 आरोपींना आज बीडमधील न्यायालयात हजर केले जाणार आहे. या सहा आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार आहे. आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.
आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांना हजर केले जाणार आहे. यातील सुधीर सांगळे, सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे हे माजलगाव येथील पोलीस कोठडीत आहेत. Walmik Karad |
आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार
तर जयराम चाटे, प्रतीक घुले व महेश केदार हे गेवराई पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहेत.. त्या ठिकाणाहूनच हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीत सहभागी होतील अशी शक्यता आहे. दरम्यान, यामधील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे. पोलीस त्याचा तपास घेत आहेत, त्यासाठी विशेष पथके रवाना झाली आहेत. Walmik Karad |
वाल्मीक कराडच्या जामिनावर सुनावणी
मस्साजोग येथील आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना २ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी केज न्यायालयाने वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. याचवेळी त्याचे वकील ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केज न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. याप्रकरणी शनिवारी केज न्यायालयात न्या. एस. व्ही. पावसकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडला जेल की बेल मिळणार हे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा: