पुणे : रेल्वेच्या दौंड रेल्वे कंझ्युमर डेपोतून 11 कोटी रुपयांचे डिझेल चोरी केल्याप्रकरणात मुख्य इंधन निरीक्षकास सीबीआयने सात वर्षे तुरुंगवास आणि सव्वा लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सीबीआयचे विशेष न्यायाधीश पी. सी. भगुरे यांनी हा निकाल दिला.
वीरसिंह कुंवारसिंह चौधरी असे शिक्षा देण्यात आलेल्या रेल्वे अधिकाऱ्याचे नाव आहे. तर इतर सात आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. सुटका झालेल्यांच्या वतीने निवृत्त न्यायाधीश ऍड. पद्माकर चौधरी, ऍड. प्रमोद पाटील, ऍड. विश्वास पाटील आणि ऍड. इब्राहिम शेख यांनी कामकाज पाहिले.
सरकारी पक्षातर्फे खटल्याचे कामकाज अभयराज आरीकर यांनी पाहिले. या प्रकरणात 40 साक्षीदार तपासण्यात आले. वीरसिंह हा एप्रिल 2011 ते सप्टेंबर 2012 दरम्यान दौंड रेल्वे कंझ्युमर डेपोमध्ये मुख्य इंधन निरीक्षक होता.
त्याने पदाचा गैरवापर करून 11 कोटी 10 लाख 42 हजार रुपयांची डिझेल चोरी केली. या प्रकरणी एकूण आठ जणांना आरोपी करण्यात आले होते. त्यांच्याविरोधात सीबीआयने दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने यावर सुनावणी