fbpx

संजय राऊत पप्पू सेना माझे घर तोडू शकते मात्र…

मुंबई –  मुंबई : आज विजयादशमी दसरा. या दिवशी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाकडे लक्ष लागून असते. आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून विरोधकांकडून  टीका टिप्पणी केली जात आहे यातच अभिनेत्री कंगना राणावतनेही शिवसेनेवर खोचक शब्दात टीका केली आहे.

काय म्हणाली कंगना राणावत

माझे स्वप्न तुटले आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू आले संजय राऊत पप्पू सेना माझे घर तोडू शकते मात्र माझी  हिम्मत नाही …माझं बंगला  आज असत्यावर सत्याच्या विजयाचे सेलिब्रेशन करत आहे.  असं म्हणत तिने राज्य सरकारवर टीका केली आहे.

तत्पूर्वी, कंगना मुंबईत येण्यापूर्वीच मुंबईतील पाली हिल परिसरात असलेल्या कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेचा हातोडा पडला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.