मुंबई – देशभरामध्ये आज 74 प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे सध्या देशात आनंदाचं आणि मांगल्याचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सर्व देशवासियांना 74 प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या संदर्भातील एक पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली आहे.
गणतंत्र दिवस की ढेर सारी शुभकामनाएं। इस बार का यह अवसर इसलिए भी विशेष है, क्योंकि इसे हम आजादी के अमृत महोत्सव के दौरान मना रहे हैं। देश के महान स्वतंत्रता सेनानियों के सपनों को साकार करने के लिए हम एकजुट होकर आगे बढ़ें, यही कामना है।
Happy Republic Day to all fellow Indians!
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2023
मोदी आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात… “प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.! हा प्रसंग देखील खास आहे कारण आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान तो साजरा करत आहोत. देशाच्या महान स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण एकत्र पुढे जावे अशी आमची इच्छा आहे. सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!’ या आशयाची पोस्ट पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.