जहाल नक्षली सृजनक्का पोलीसांसोबत झालेल्या चकमकीत ठार

गडचिरोली : जहाल नक्षली आणि कसनसूर दलमची विभागीय समिती सदस्य(डीव्हीसी) सृजनक्का गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्‍यात सिनभट्टी जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाली.

विविध पोलिस ठाण्यांमध्ये सृजनक्कावर 144 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शासनाने तिच्यावर 16 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पोलिसांच्या सी-60 पथकाचे जवान काल दुपारी जारावंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिनभट्टी जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना तेथे नक्षल्यांचे शिबिर सुरु असल्याचे दिसले.

नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षल्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता एका नक्षली महिलेचा मृतदेह सापडला.

या महिलेची ओळख आत्मसमर्पित नक्षलींद्वारे पटविण्यात आली. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक एके-47 रायफल, प्रेशर कूकर, क्‍लेमोर माईन तसेच नक्षल्यांचे दैनंदिन वापराचे साहित्य ताब्यात घेतले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.