आंध्र प्रदेशात जगमोहन रेड्डी होणार मुख्यमंत्री

30 मे रोजी घेणार शपथ

हैदराबाद – आंध्रप्रदेशमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेची मतमोजणी करण्यात येत आहे. सध्याच्या कलानुसार वायएसआर कॉंग्रेस 152 जागांवर आघाडीवर आहे. यावरुन वायएसआर कॉंग्रेस पक्षाचा विजय निश्चित मानला जात आहे. जगनमोहन रेड्डी हे 30 मे रोजी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती उमारेड्डी व्यंकटेश्वरलू यांनी दिली.आंध्र प्रदेशातील विधानसभेच्या 175 जागांवर मतमोजणी सुरु आहे.

सुरुवातीला आलेल्या आकडेवारीनुसार आंध्रात चंद्राबाबूंच्या पक्षाचा धुव्वा उडण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे वायएसआर कॉंग्रेस सत्तेवर आपला दावा सांगणार असून जगमोहन रेड्डी 30 मे रोजी मुख्यमंत्रीपदीची घेणार शपथ आहेत.आंध्रप्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात चंद्राबाबू नायडू यांना अपयश आले. कॉंग्रेससोबत आघाडी न केल्याने त्यांच्या मतांचे विभाजन झाले. या सर्व कारणामुळे चंद्राबाबूंना पराभवाचा सामना करावा लागत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.