जागर नारीशक्तीचा

आजचा रंग – निळा
चतुर्थ रूप – कृष्मांडा

कृष्मा म्हणजे अत्यंत त्रासदायक असा उष्मा किंवा ताप होय. या ठिकाणी तीन ताप म्हणजे आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक असा अर्थ आहे. तसेच अंड म्हणजे उदर. याचा अर्थ त्रिविध ताप देणारा संसार जी आपल्या उदरात धारण करते ती कृष्मांडा देवी होय.

सूर्यमंडळनिवासिनी ही देवी सूर्यतेज धारण करते. या अष्टभुजा मातेच्या सात हातांमध्ये शस्त्रे व एका हातात जपमाळ आहे. ती साधकातील कुसंस्कारांचा नाश करते. दीर्घायुष्य, आरोग्य, सामर्थ्य आणि यशप्राप्ती करून देते.

(संकलन : लेखिका माधुरी विधाटे)

Leave A Reply

Your email address will not be published.