भाजप शहराध्यक्षपदी जगदीश मुळीक

पुणे – युवा नेतृत्वाला संधी देत भाजपने शहराध्यक्षपदी माजी आमदार जगदीश मुळीक यांची निवड केली आहे. बुधवारी झालेल्या “संघटनपर्व’ कार्यकर्ता मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकात पाटील यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ही घोषणा केली. यावेळी सरचिटणीसपदी राजेश पांडे, यांची तर संपर्क प्रमुखपदी गणेश बिडकर यांची निवड करण्यात आली.

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर भाजपने संघटन मजबुतीवर भर देत तरुणांना संधी देण्यास सुरूवात केली आहे. त्यातूनच जगदीश मुळीक यांची निवड करण्यात आली आहे.

मितभाषी, सर्व गटांना सोबत घेऊन जाण्याचे कौशल्य, प्रदेश वरिष्ठ नेत्यांशी चांगला संपर्क यामुळे मुळीक यांची निवड झाली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांना तातडीने नवीन जबाबदारी देऊन पक्षाने मोठी संधी दिली आहे.

निवडीनंतर मुळीक म्हणाले, “शहराध्यक्ष हे पद नसून जबाबदारी आहे. आता मी संघटना व पक्ष वाढीसाठी प्रयत्न करेल. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी झटत राहील. पक्षाने माझ्यावर जो विश्‍वास दाखवला आहे, त्याला मी तडा जाऊ देणार नाही.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.