पारनेर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई
बेल्हे- वडझिरे (ता. पारनेर) येथील गोळीबारामध्ये सविता सुनील गायकवाड यांचा सोमवारी (दि. 17) मृत्यू झाला होता. पारनेर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या अथक प्रयत्नानंतर मुख्य आरोपी राहुल साबळेचा साथीदार सुरेश ऊर्फ नटराज सोन्याबापू मापारी (रा. लोणी- मावळा) याच्या मुसक्या आवळल्या. अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी तथा विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारनेर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेने ही कारवाई केली आहे.
गुन्ह्यातील मुख्य आरोपीला गुन्हा करण्याकामी मदत केल्याचे निष्पन्न झाल्यानेच सोमवारी (दि. 24) रोजी अटक करुन विशेष न्यायालय अहमदनगर येथे हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठठी सुनावली आहे. पुढील तपास तपासी अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करीत आहे.