मुंबई – अभिनेत्री ‘जॅकलिन फर्नांडिस’ हिने अतिशय कमी कालावधीतच बॉलिवूडमध्ये आपले चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. ‘चिट्टीयां कल्लाईयां वे…’ या गाण्यामुळे जॅकलिन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.
जॅकलिन सोशल मीडियावर जोरदार सक्रिय असते, ती सतत आपल्या इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. फक्त अभिनयावरच नाही तर तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते चांगलेच फिदा आहेत.
दरम्यान, जॅकलिन फर्नांडिस’ने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर साडी परिधान केल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोतील तिचा अंदाज फॅन्सला अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.
याआधी देखील तिने अनेकवेळा ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. जॅकलिनने मिस श्रीलंका हा किताब पटकावला होता.
जॅकलिनचे वडील श्रीलंकन असून तिची आई मलेशियातील आहे. तिने सिडनीमधून मास कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.