जॅकलीन फर्नांडिसने सुरू केले “रामसेतू’चे शूटिंग

मुंबई- जॅकलीन फर्नांडिसने शनिवारपासून “रामसेतू’चे शूटिंग सुरू केले आहे. या सिनेमातील आपला फर्स्ट लुकदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. डोक्‍यावरून पदर ओढून घेतलेली जॅकलीन या लुकमध्ये अगदी वेगळी दिसते आहे. हा सिनेमा आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आणि सन्मान वाटावा असा प्रोजेक्‍ट आहे. असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

या प्रोजेक्‍टमध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल तिने अक्षय कुमारचे आभार मानले आहेत. “रामसेतू’मध्ये अक्षय कुमार आणि जॅकलीनबरोबर नुसरत भरूचादेखील आहे आणि तिनेही अक्षयच्या बरोबर आपला फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पहिल्यांदाच आर्किओलॉजिकल संशोधन बनलेल्या अक्षय कुमारला भारत ते श्रीलंका दरम्यानच्या नैसर्गिक पुलाचा शोध घेण्याची जबाबदारी या सिनेमात पार पाडायची आहे. जॅकलीन, अक्षय आणि नुसरतने एकत्र बसून “राम सेतू’च्या स्क्रिप्टची पारायणे केली आहेत. त्यांच्या एकत्र वाचनाचे फोटो नुसरत आणि जॅकलीननेही शेअर केले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.