जॅकलीन फर्नांडिसने प्रियांका चोप्राचे मुंबईतील घर विकत घेतले आहे. 2018 मध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे लग्न झाले, तेंव्हा प्रियांकाकडे हे घर होते. लग्नाचे काही कार्यक्रमदेखील याच घरात झाले होते. आता जॅकलीनने हे घर विकत घेतले आहे.
View this post on Instagram
यापूर्वी जॅकलीन बांद्रयात भाड्याच्या फ्लॅटमध्ये रहात होती. आता ती लवकरच या नवीन घरामध्ये शिफ्ट होणार आहे. प्रियांकाच्या या घराचे नाव “कर्मयोग’ आहे आणि या घराची किंमत 7 कोटी रुपये आहे, असे समजते आहे.
View this post on Instagram
लग्नानंतर प्रियांका आणि निक जोनास यांनी लॉस एंजेलिसमध्ये 20 दशलक्ष डॉलरला एक आलिशान बंगला विकत घेतला, घराला मोठा ऐसपैस एरिया आणि मोठी विशाल बाल्कनीदेखील आहे. याशिवाय दोन बॉलिंग लेन, सुसज्ज जीम आणि बारदेखील आहे. याशिवाय होम मुव्ही थिएटर आणि इनडोअर बास्केटबॉल कोर्ट, एक गेम रूम आणि पूल टेबलदेखील आहे. प्रियांका आणि निक जोनास पूर्वी दुसऱ्या घरामध्ये रहात होते.पण नंतर त्यांनी ते घ्रर6 दशलक्ष डॉलरला विकून टाकले होते.जॅकलीन फर्नांडिसने यापूर्वी शिरीष कुंद्राची वेबसिरीज “मिसेस सीरियल किलर’मध्ये काम केले होते. आता ती “बच्चन पांडे’, “भूत पोलीस’ आणि “सर्कस’मध्ये दिसणार आहे.