मुंबई – परदेशातील कलाकारांना बॉलीवूडचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. कारण जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग म्हणून बॉलीवूडकडे पाहिले जाते. दरवर्षी हजारापेक्षा अधिक चित्रपटांची निर्मिती भारतात होते. दाक्षिणात्य, हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी आशिया खंडातीलच नाही तर युरोप, कॅनडा कलाकारही भारतात येण्यासाठी उत्सुक असतात. यातच श्रीलंकेहून आलेल्या अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने आपल्या तालावर सिनेप्रेक्षकांना थिरकायला लावले असून हिने सुद्धा बॉलिवूडमध्ये तिने वेगळे स्थान निर्माण केले आहे.
दरम्यान, जॅकलिनने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत तिने तिचा चेहरा चक्क दागिन्यांनी झाकला आहे. त्यामुळे तिचा हा फोटो चर्चेत आला आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
The madness behind stage shows! Dabangg Dubai! Out tomo ?? @abhishek4reel
तत्पूर्वी, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने इंस्टाग्राम अकाऊंटवरून टॅटूचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ पोस्ट करताना जॅकलिनने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘पहिल्यांदा टॅटू’ या व्हिडिओमध्ये ती पहिल्यांदा टॅटू काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.