बहुचर्चित ‘बच्चन पांडे’मध्ये आता जॅकलीन फर्नांडिस देखील

सजिद नाडियादवालाची निर्मिती असलेल्या “बच्चन पांडे’च्या कलाकारांच्या टीममध्ये आता जॅकलीन फर्नंडिस देखील असणार आहे. या कॉमेडी ड्रामामध्ये अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि क्रिती सेनन ही मंडळी यापूर्वीच निवडली गेली आहेत. साजिद नाडियादवालाबरोबर पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे, याचा खूप आनंद वाटतो आहे.

त्याच्याबरोबर “जुडवा’ आणि ‘हाऊसफुल्ल’च्या सिरीजनंतरचा हा आठवा सिनेमा आहे, असे जॅकलीनने सांगितले. त्याच्या बरोबर काम करणे म्हणजे अगदी येड्यासारखी कॉमेडी करण्याचा आनंद असतो. आता देखील हास्याचे स्फोट घडतील, अशी आपल्याला खात्री वाटत असल्याचे जॅकलीनने सांगितले.

जॅकलीनच्या वाट्याचे शुटिंग जानेवारीमध्ये सुरू होणार आहे. मात्र तोपर्यंत आपल्या व्यक्तिरेखेबद्दल थोडी उत्सुकता ताणून ठेवायला तिने फॅन्सना सांगितले आहे. तिच्या शुटिंगसाठी तिला राजस्थानात जैसलमेरला जायचे आहे. जैसलमेर व्यतिरिक्‍त गाडिसर लेक आणि जैसलकोट इथेही या सिनेमाचे शुटिंग होणार आहे.

“बच्चन पांडे’ अर्थात अर्शद वारसी हा एक गॅंगस्टर आहे आणि त्याला फिल्म ऍक्‍टर बनायचे आहे. या सिनेमात क्रिती सेनन पत्रकार म्हणून दिसणार आहे. तिला फिल्म डायरेक्‍टर व्हायचे असते. अशी वेडीवाकडी स्वप्ने घेतलेली ही मंडळी काय भन्नाट कॉमेडी करणार आहेत, हे लवकरच समजणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.