जॅकलीन पडली श्रीलंकेच्या प्रेमात

जॅकलीन फर्नांडिस मूळची श्रीलंकेची आहे, हे फार कमी जणांना माहीत असावे. काही दिवसांपूर्वी तिथे झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटांमुळे जॅकलीन खूप व्यथित झाली होती, पण आता श्रीलंकेतील परिस्थिती खूप सुधारली आहे. तेथील पर्यटन व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस येत आहेत, हे ऐकून तिला खूप बरे वाटते आहे.

जॅकलीनवर श्रीलंकेतील पर्यटन व्यवसायाच्या प्रचाराची जबाबदारी आहे. दीर्घकाळापासून श्रीलंका पर्यटनाच्या बाबतीत आशियातील नंबर एकचे ठिकाण राहिलेला होता. अलीकडच्या काळात भारताकडून श्रीलंकेला खूप मदत झाली, त्याबद्दलही जॅकलीनला खूप समाधान वाटते आहे. श्रीलंकेतील पर्यटन व्यवसाय थोडा मागे पडला आहे. पर्यटकांच्या मनात दहशतवादी हल्ल्यांनंतर थोडी भीती बसली आहे, पण श्रीलंका पर्यटकांसाठी पूर्ण सुरक्षित आहे, याची हमी जॅकलीनने दिली आहे. श्रीलंका खरोखर जन्नत आहे, हे तथ्य बदलणार नाही, असे जॅकलीन म्हणाली.

तिला कोणी विश्‍वासार्ह कलाकार म्हटलेले खूप आवडते आहे. असे कोणी म्हटले की तिला खूप बरे वाटते. असे म्हटल्याने लोकांच्या मनात आपल्याबद्दल किती आदर आहे, हे लक्षात येत असल्याचे ती म्हणाली. गेल्या 10 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करते आहे, पण अजूनही खूप काम करायचे बाकी आहे. हा सफरही खूप कष्टाचा होता. लोकांचा विश्‍वास संपादन करणे ही काही सोपी गोष्ट नक्कीच नाही.

2014 साली आलेल्या “किक’च्या सिक्‍वेलमध्येही ती काम करणार आहे. याशिवाय “मिसेस्स सिरीयल किलर’ या नेटफ्लिक्‍सवरच्या वेबसिरीजच्या माध्यमातून ती डिजीटल वर्ल्डमध्ये पदार्पण करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.