बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिच्या प्लेलिस्टसाठी वेळोवेळी सुपरहिट गाणी दिली आहेत. तिच्या प्रत्येक परफॉर्मेंसने एक वेगळीच छाप सोडली आहे. नुकतीच अभिनेत्री आणि तिच्या चाहत्यांना तिच्या “बीट पे बूटी’ या गाण्यास 4 वर्षे, तर तिच्या आणखी एक गाणे “चंद्रलेखा…’ला 3 वर्षे पूर्ण झाल्याचा जश्न केला. जॅकलिनच्या “बीट पे बूटी’ या हिट गाण्याने तेव्हा सोशल मीडियावर तहलका केला होता.
चाहत्यांनी या गाण्यावरील परफॉर्मेंसचा पुरेपूर आनंद लुटला आहे. या प्रसंगाबद्दल जॅकलिनने शेअर केले की, मला विश्वास होत नाही की हे गाणे माझे आहे. “बीट पे बूटी’ला 4 वर्षे पूर्ण केली. तेच चंद्रलेखाला 3 वर्षे पूर्ण झाली. मला ते क्षण आजही आठवतात, जेव्हा बीट पे बूटीच्या चॅलेंजने सर्वांना नाचण्यास भाग पाडले होते. तसेच चंद्रालेखासाठी पोल डान्स शिकणेही अद्भुत होते. या गाण्यांवर परफॉर्म आणि शूटिंग करायला खूपच मजा आली होती.
दरम्यान, हृतिक रोशन आणि जॅकलिनने जेव्हा चॅलेंजवर एकत्रित डान्स केला होता, तो क्षण आजही चाहत्यांच्या मनावर कोरलेला आहे. तेव्हापासून प्रेक्षक त्यांना पुन्हा एकत्रीत पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच चंद्रलेखामध्ये टायगर श्रॉफ आणि जॅकीला एकत्र पाहणेही एक आनंदाचा क्षण होता. या गाण्यातून जॅकलीनने बॉलीवूडमध्ये पोल डान्सचा ट्रेंड सुरू केला होता.