“रामसेतु’मध्ये झळकणार जॅकलीन आणि नुसरत भरूचा

मुंबई – बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमार याने गतवर्षी दिवाळीला आपल्या “रामसेतु’ या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासूनच या चित्रपटात अक्षयच्या अपोझिट कोणती अभिनेत्री काम करणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता अक्षयकुमार स्टारर “रामसेतु’साठी दोन अभिनेत्रींची निवड करण्यात आली आहे.

या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा झळकणार आहेत. यापूर्वीही जॅकलीनने अक्षयसोबत काम केलेले असून या जोडीला चाहत्यांना चांगली पसंती मिळत आहे. अशात परत एकदा ही जोडी चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

दुसरीकडे नुसरत भरूचा ही पहिल्यांदाच अक्षयसोबत काम करणार आहे. या चित्रपटासाठी दीर्घ काळापासून अभिनेत्रींचा शोध सुरू होता. आता जॅकलीन आणि नुसरत यांची नावे निश्‍चित करण्यात आली आहे.

या दोघींनाही चित्रपटासाठी साइन करण्यात आले आहे. यापूर्वी जॅकलीन-अक्षयची जोडी “ब्रदर्स’, “हाउसफुल 2′ आणि “हाउसफुल 3’मध्ये झळकली होती. या जोडीने बॉक्‍स ऑफिसवर चांगलीच धम्माल केलेली आहे. 

अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात जॅकलीन ही सीता, तर अक्षयकुमार हा रामाची भूमिका साकारणार आहे. परंतु नुसरतच्या भूमिकेबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही. हा चित्रपट रामायण आणि भगवान राम यांच्या आदर्शावर आधारित असणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.