अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही आपल्या पॉझिटिव्ह थिंकिंगसाठी ओळखली जाते. सध्या करोनाच्या या निराशेच्या वातावरणात तिने लोकांना सकारात्मक राहण्यासाठीचा संदेश दिला आहे. अलीकडेच तिने तिच्या सोशल मीडियावर संवाद साधत करोना व्हायरसपासून कसा बचाव करावा याबाबत सल्ला दिला आहे.
जॅकलिन फर्नांडिस करोना व्हायरसमुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी मदतीचे आवाहन केले आह.ेतसेच तिने मजुरांसाठी आर्थिक मदतही जाहीर केली आहे. तिने मुंबईतील 2500 कुटुंबांना लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू देणार असल्याचे सांगितले.
तसेच तिने करोनावर मात करणा-या सुरतमधील 21 वर्षीय रीता बचकानीवाला हिच्याशी संवाद साधला होता. यावेळी रीता म्हणाली, करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी घरात राहणे हाच एकमेव मार्ग आहे आणि त्याला सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. तसेच याकाळात रुग्णालयाकडूनही सर्वोत्तम कामगिरी केली जात आहे. याशिवाय आपल्याला काही लक्षणे जाणविल्यास त्याबाबत तातडीने डॉक्टरांना माहिती देणे गरजेचे आहे.
दरम्यान, जॅकलिन म्हणाली, काही लोक अस्वस्थ आहेत. त्यांना असे वाटते की, जणू जगाचा अंत होणार आहे. कदाचित त्यांना हे ठाऊक नाही की काळजी घेण्यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे. ती म्हणजे घरातच राहणे, असे जॅकलिनने सांगितले.