कांडला (दक्षिण आफ्रिका) – दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष जेकब झुमा आज सकाळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांना तुरुंगात नेण्यात आले आहे.
झुमा यांना आत्मसमर्पण करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत संपण्याच्या काही मिनिटे अगोदरच झुमा यांनी कांडला येथील घरातून निघून पोलिसांकडे गवाना झाले.
दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने न्यायालयाच्या अवमानप्रकरणी झुमा यांना 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या आदेशांचा मान राखून ही शिक्षा भोगण्याचे झुमा यांनी ठरवले आहे, असे ट्विट झुमा फौंडेशनच्या वतीने पोस्ट करण्यात आले. हा ट्विट पोस्ट झाल्यानंतर थोड्याच वेळात झुमा पोलिसांच्या कोठडीमध्ये दाखल झाले असल्याचे पोलिसांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
झुमा यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर दक्षिण आफ्रिकामध्ये तणाव निर्माण झाला होता. न्यायालयीन आयोगापुढे हजर होण्याचे न्यायालयाचे आदेश झुमा यांनी धुडकावून लावले होते. म्हणून न्यायालयाच्या अवमानप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावली गेली होती. झुमा यांना अटक होऊ नये म्हणून त्यांच्या घराबाहेर शेकडे समर्थकांची गर्दी जमा झाली होती. झुमा यांनी बुधवारी मध्यरात्रीपर्यंत आत्मसमर्पण केले नाही तर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्याचा इशाराही न्यायालयाने दिला होता.