“मुंबई सागा’मध्ये जॅकी श्रॉफची धमाकेदार एंट्री

बॉलीवूडमधील बिग बजेट असलेल्या सलमान खानच्या “भारत’ चित्रपटात जॅकी श्रॉफच्या परफॉर्मेंची खूपच दमदार राहिला. चित्रपटातील मुख्य नायक सलमान खान आणि कतरिनासह जॅकीनेही चाहत्यांच्या वाहवाह मिळविली. सध्या जॅकीकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर आहेत. यापैकी एक म्हणजे “मुंबई सागा’.

हा चित्रपट एक गॅंगस्टर ड्रामा असून यात जॅकी श्रॉफसह सुनील शेट्‌टी, जॉन अब्राहम आणि इमरान हाशमी मुख्य भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता करणार आहे.

“मुंबई सागा’बाबत संजय गुप्ता म्हणाले, चित्रपटसृष्टीत 25 वर्षे काम करत 17 चित्रपट दिल्यानंतर आता प्रेक्षकांना आणखी भव्य असे काहीतरी देवू इच्छित आहे. हा चित्रपट माझ्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. ज्यासाठी एका अशा निर्मात्याचा शोध सुरू आहे जो कल्पनाशील आहे. यासाठी मी भूषण कुमार यांचे आभार मानतो.
दरम्यान, 1980-90च्या दशकावर आधारित असलेल्या या चित्रपटात बॉम्बे मुंबई कशी झाली आणि त्याप्रसंगी काय-काय घडले होते हे पडद्यावर मांडण्यात येणार आहे. “मुंबई सागा’चे शूटिंग जुलैमध्ये सुरू होण्याची शक्‍यता असून हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×