Jackie Shroff | अभिनेता वरुण धवन स्टारर ‘बेबी जॉन’ बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप ठरला. 25 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या चित्रपटात कीर्ती सुरेश, वामिका गब्बी आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. ॲक्शन थ्रिलरबद्दल खूप अपेक्षा होत्या पण बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप ठरला. आता जॅकी श्रॉफने ‘बेबी जॉन’च्या बॉक्स ऑफिसवरील अपयशावर पहिल्यांदाच मौन सोडले आहे.
एका मुलाखतीत जॅकी श्रॉफ म्हणाले, “या सगळ्याचा निर्मात्यांवर परिणाम होतो. त्यांनी या प्रोजेक्ट्साठी विश्वास ठेवून खूप पैसे लावलेले असतात. जर ही रक्कम रिकव्हर झाली नाही तर एक अभिनेता म्हणून फार वाईट वाटतं. प्रत्येकाला वाटत असतं की आपला परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावा शिवाय चित्रपटाने देखील चांगली कमाई करावी असं आपल्याला वाटत असतं.
यामुळे निर्मात्यांसाठी दु: ख होतं. तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करता, पण ज्यांनी पैसे गुंतवले आहेत त्यांचाही तुम्हाला विचार करावा लागेल.” अलिकडेच राजपाल यादवने देखील एका मुलाखतीमध्ये ‘बेबी जॉन’च्या अपयशावर भाष्य केलं होतं. Jackie Shroff |
ॲक्शन थ्रिलर ‘बेबी जॉन’चे दिग्दर्शन केलेस यांनी केले आहे आणि ॲटली निर्मित आहे. हा चित्रपट थलपथी विजयच्या ब्लॉकबस्टर ‘थेरी’चा रिमेक आहे. 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या वीकेंडला रिलीज झालेल्या या चित्रपटाने 11.25 कोटींची चांगली ओपनिंग केली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी हा चित्रपट फ्लॉप झाला आणि त्याच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली. या चित्रपटात खलनायकाची भूमिका जॅकी श्रॉफने साकारली होती. Jackie Shroff |
‘बेबी जॉन’ 180 कोटींच्या अंदाजे बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटाने जगभरात केवळ 60.4 कोटी रुपये आणि भारतात 39.34 कोटी रुपये कमावले आहेत.
हेही वाचा:
Jailer 2 : जेलर 2 ची घोषणा; ४ मिनिटांच्या प्रोमोत सुपरस्टार रजनीचा थरारक अवतार, तुम्ही पाहिला का?