अलिबाबावर चीन सरकारची वक्रदृष्टी; उद्योगपती जॅक मा यांना ‘ती’ टीका महागात

बीजिंग – जगातील अब्जाधीशांपैकी एक असलेले अलिबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांना चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या धोरणावर टीका करणे महागात पडले आहे. चीन सरकारकडून जॅक मा यांच्या अलिबाबा कंपनीची कसून चौकशी सुरू असून सरकारने अलिबाबावर मोठी कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई झाली असून तब्बल 2. 78 अब्ज डॉलरचा दंड ठोठावला आहे. अलिबाबावर झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जाते तसेच आपल्याच देशावर एवढी कठोर कारवाई केली जाण्याची कोणत्या देशाने केलेली ही अशा स्वरूपाची पहिलीच कृती असल्याचे स्पष्ट होते आहे.

अलिबाब ग्रुपने एकाधिकारविरोधी नियमांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याचप्रमाणे बाजारपेठेत आपल्या विश्वासार्हतेचाही दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत कंपनीला दंड ठोठावण्यात आला आहे. सरकार कारवाईमागील कारणे काहीही सांगत असले आणि याचे समर्थन करत असले तरी मुळात जॅक मा यांनी सरकारच्या धोरणांवर काही महिन्यांपूर्वी टीका केली होती. त्याचे मूल्य त्यांना चुकवावे लागते आहे. मध्यंतरीच्या काळात जॅक मा अज्ञातवासात गेले होते. ते स्वत:हून गायब झाले आहेत की यामागेही सरकारचे काही कारस्थान आहे अशा उलट सुलट चर्चा जगभरातील माध्यमांमध्ये रंगू लागल्यानंतर अचानक एक दिवस मा हे प्रकट झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या कंपनीच्या कार्यक्रमांच्या व्यासपीठांवरही त्यांनी हजेरी लावली होती व ही बाब जगभभरातील माध्यमांना स्पष्टपणे जाणवली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.