मुंबई – ‘सैराट’ या चित्रपटाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला याड लावले होते. यातील गाणी, डायलॉग, लोकेशनसह सर्वकाही हिट ठरले होते. अशातच चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी आर्ची आणि परश्या ही जोडी चागंलीच हिट ठरली.
अभिनेता आकाश ठोसरने परश्याची, तर रिंकू राजगुरूने आर्चीची भूमिका निभावली होती. या चित्रपटातून एका रात्रीत दोघेही लोकप्रिय झाले होते. यानंतर पुढील प्रवासाकरीता दोघांनी आप-आपली वाट धरली. अशातच आता बऱ्याच वर्षानंतर रिंकू आणि आकाश एकत्र आले आहेत.
View this post on Instagram
या दोघांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. रिंकूने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहले आहे की, बऱ्याच दिवसांनंतर जुन्या मित्राला भेटल्यानंतर खूप आनंद झाला. आजही भेटल्यानंतर ती फिलिंग अजून बदलली नाही.
View this post on Instagram
दोघांनाही एकत्र पाहून चाहते फारच खूश झाले आहेत. दोघांच्याही फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सैराटनंतर रिंकू अनेक मराठी चित्रपट झळकली. इतकचं नाही तर हंड्रेड, अनपॉज्डसारख्या वेब सिरीजमध्ये रिंकूने काम केले.