बर्मिंगहॅम – भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटी रोमांचक ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच दरम्यान, इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात मैदानावर वाद झाला.
भारताविरुद्धच्या कसोटीत फलंदाजी करताना विराट कोहली व जॉनी बेअरस्टो यांच्यात शाब्दिक चकमक घडली. महंमद शमीच्या गोलंदाजीवर बाद होता होता वाचल्यावर बेअरस्टो शमीला उद्देशून काहीतरी बडबडला. त्यावर कोहलीने त्याला चांगलेच खडसावले.
It’s tense out there between Virat Kohli and Jonny Bairstow 😳#ENGvIND pic.twitter.com/3lIZjERvDW
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 3, 2022
तुझे तोंड बंद ठेव व शांतपणे फलंदाजीवर लक्ष केंद्रित कर. विनाकारण आमच्या गोलंदाजांवर दडपण आणण्याचा प्रयत्न करू नकोस, अशा शब्दांत कोहलीने बेअरस्टोची बोलतीच बंद केली. यानंतर पंचांना हस्तक्षेप करुन वाद मिटवावा लागला.
या कसोटी मालिकेत पूर्वी झालेल्या एका कसोटीतही बेअरस्टो व कोहली यांच्यात शाब्दिक देवाण-घेवाण झाली होती. त्यावेळीही कोहलीने त्याला चांगलेच फैलावर घेतले होते.