ऐकावे ते नवलच! नवऱ्याच्या गळ्यात पट्टा घालून कुत्रा म्हणून फिरवत होती महिला

पोलिसांनी ठोठावला २ लाखांचा दंड

नवी दिल्ली – जगभरातील करोनाचे संकट कायम असून काही देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. कॅनडामध्येही चार आठवड्यांचा कर्फ्यू लागू केला आहे. अशातच धक्कदायक बाब समोर आली आहे. बायको नवऱ्यालाच कुत्र्याचा पट्टा घालून फिरवत होती.

कॅनडामध्ये सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे. परंतु, किंग स्ट्रिट ईस्टमधील महिलेने घराबाहेर पडण्यासाठी अजब शक्कल लढवली आहे. या महिलेने पतीच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधला आणि रस्त्यावर एखाद्या कुत्र्याप्रमाणे आपल्या पतीला फिरवत होती.

हे पोलिसांनी पहिले असता लॉकडाऊन असतानाही तुम्ही येथे काय करत आहेत, अशी विचारणा केली. यावर मी माझ्या पाळीव प्राण्याला फिरवत आहे आणि पाळीव प्राण्यांना फिरवण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली आहे, अस युक्तिवाद त्या महिलेने केला.

माहितीनुसार, पोलिसांनी या जोडप्याला लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न केल्यामुळे १५००-१५०० डॉलर दंड लावला आहे. भारतीय चलनानुसार २ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.