Chitra Wagh post : अजित पवार आपल्यात नाहीत ही गोष्टीच महाराष्ट्राला स्विकारले कठीण जात आहे. सकाळपासून अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पवार कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांना आपले अश्रू थांबवणे कठीण झाले आहे. राजकीय नेते अजित पवार यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अजित दादा आपल्यात नाहीत हे स्वीकारणचं अवघड जातंय… महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे तीन लाडके भाऊ आहेत त्यातील एक भाऊ आज आपल्यात नाही राहिला हा खूप मोठा आघात महाराष्ट्रावर झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मजबूत आधारस्तंभ आज अचानक कोसळल्यासारखं वाटत आहे…… pic.twitter.com/xIRd86ytvN — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 28, 2026 भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील एक्सवरून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजित दादा आपल्यात नाहीत हे स्वीकारणचं अवघड जातंय… महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे तीन लाडके भाऊ आहेत त्यातील एक भाऊ आज आपल्यात नाही राहिला हा खूप मोठा आघात महाराष्ट्रावर झाला आहे, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी अजित पवार यांच्याप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हेही वाचा : Ajit Pawar : गॉगल आणि घड्याळावरून आम्ही दादांना बाहेर काढले…; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मजबूत आधारस्तंभ आज अचानक कोसळल्यासारखं वाटत आहे… अजितदादांच्या जाण्याने केवळ एक नेता नाही, तर निर्धार, कणखर आणि निर्णयक्षम नेतृत्व हरपलं आहे. प्रत्येक संकटात धैर्यानं उभं राहणारे, कामासाठी स्वतःला झोकून देणारे आणि राज्याच्या विकासासाठी अखंड धडपड करणारे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेलं. ही बातमी मन सुन्न करणारी आहे, शब्द अपुरे पडतात. असे देखील चित्रा वाघ यांनी पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत. त्यांच्या आठवणी, कार्य आणि महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान कधीही विसरता येणार नाही. राजकारणापलीकडे जाऊन, एक कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व हरपल्याने राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. या दुःखद क्षणी पवार कुटुंबीय, सहकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या वेदनेत आम्ही सर्वजण सहभागी आहोत. हे अपार दुःख सहन करण्याचं बळ आपल्या सर्वांना मिळो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली… ॐ शांती हेही वाचा :Ajit Pawar : गॉगल आणि घड्याळावरून आम्ही दादांना बाहेर काढले…; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव