नवी दिल्ली : सध्या सर्वत्र थंडीचे वातावरण निर्माण झाले आहे. हुडहुडी भरणारी थंडी देशासह जगभरात पाहायला मिळत आहे. दरम्यान, अशीच गोठवणारी थंडी आणि एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो आहे हवेत तरंगणाऱ्या एका काटा चमच्याचा आणि नूडल्सचा.
Today it's -45C (-49F) in my hometown Novodibirsk, Siberia. pic.twitter.com/EGxyrRqdE2
— Oleg (@olegsvn) December 27, 2020
Oleg या सायबेरियाच्या ट्विटर युजरने हा फोटो पोस्ट केला आहे. ज्यावर अनेकांचा पाहताक्षणी विश्वासच बसत नाही. कारण, हा फोटो आहे गोठलेल्या नूडल्स आणि अंड्याचा. इथं 15 अंशांवर मुंबईचं तापमान आलं तरीही हुडहूडी भरते, पण तिथं सायबेरियामध्ये तर, तापमानाचा आकडा विश्वासही बसणार नाही इतका खाली गेला आहे.
Oleg या युजरची पोस्ट पाहता सध्या तिथं तापमानाचा आकडा उणे 45 अर्थात -45 अंश सेल्शिअसवर पोहोचला आहे. त्यामुळं हा आकडा पाहूनच सर्वांनाच धक्का बसत आहे.
Mr.India spotted on vacation in Siberia 😝@AnilKapoor pic.twitter.com/ziwQwm9aLJ
— तिवारी जी 🙊 (@Sharadtiwarii) December 29, 2020
सहसा थंडीमुळं पाणी गोठतं हे आपण पाहिलं असेल. पण आता सायबेरियाच्या थंडीचा कडाका नेटकऱ्यांना विचार करुनच जाणवू लागला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तिथं तापमानात झालेली घट हा चर्चेचा विषय असतानाच काही नेटकऱ्यांनी यावर धमाल मीम्सही शेअर केले आहेत.