स्वस्त असतं ते मस्तच असतंच असे नाही, म्हणूनच जग फसतं (भाग-१)

काय भावे व काय भाव आहे… मला माझ्या सुरुवातीच्या ऑफिसमधील काही लोक गमतीनं चिडवायची. दोन्ही विधानांच्या उच्चारात प्रचंड साधर्म्य असलं तरी दोन्हींच्यात अर्थात बराच फरक आहे. पहिलं विधान संबोधनपर आहे तर दुसऱ्याचा अर्थ रेट (भावा) बद्दलबाबतची विचारणा आहे. आज प्रश्न आहे आपल्याला भाव करता येतो का ? आपण म्हणजे ज्यांना भावातील फरक माहिती आहे तेच भाव करू शकतात. एखाद्या आयटीमधील युवतीस कोणतं सफरचंद 90 रु. किलो, कोणत्या प्रकारच्या सफरचंदाचा भाव 180 रु. आणि कशाचा भाव 270 रु. आहे हे कळायला दोन-चार वर्षं जातील.

आज बाजारातून कोणतीही गोष्ट खरेदी करताना योग्य भाव केल्यास म्हणजेच दरात घासाघीस केल्यास वाजवी किंमतीत चांगली वस्तू पदरात पाडून घेता येऊ शकते. आज घाऊक बाजारात किंवा मंडईमध्ये, फ्ली मार्केट्‌समध्ये, निरनिराळ्या जिन्नस खरेदीत, अगदी कापड खरेदीत (नॉन ब्रॅंडेड) खास करून साड्या खरेदीमध्ये सुद्धा आपण भाव करतो. तर ब्रॅंडेड उत्पादनांचा सेल लागल्यास तिकडं धाव घेतो आणि सेल नसल्यास काही नाही तर कॅश डिस्काउंट तरी मागतो. हेतू एकच की, कमी किंमतीत एखादी गोष्ट मिळवण्यासाठी. अनेक वेळेस एखादी उत्तम वस्तू एकदम स्वस्त मिळतेय म्हणून किरकोळ गोष्टीबाबत आपण कॉम्प्रमाईज करतो, म्हणजे 50 हजारांचा डेमो पीस लॅपटॉप 36 हजारांत मिळतोय म्हटल्यावर त्याच्या चार्जर वायरचं कोटिंग निघालं असेल तर आपण दुर्लक्ष करतो. अशा प्रकारे तीच गोष्ट अथवा वस्तू तुलनेनं कमी किंमतीत पदरात पडून घेणं हे कधीही हिताचंच परंतु इथं पारखी नजर आवश्‍यक असते की, किंमत कमी करून हीन दर्जाचा माल आपल्या गळ्यात घेत आहोत का.

स्वस्त असतं ते मस्तच असतंच असे नाही, म्हणूनच जग फसतं (भाग-२)

आता हीच गोष्ट शेअर खरेदीसंबंधी. वाढलेला शेअर सध्या कमी भावात मिळत आहे म्हणून तो खरेदी करणं ही घोडचूक ठरू शकते. विविध उदाहरणांसह ही गोष्ट मागील एका लेखात नमूद केलेलीच आहे. एकच महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे, ‘जे फुकट ते पौष्टिक’ किंवा ‘जे स्वस्त ते मस्त’ असा सूर न लावता आपण ही शेअरखरेदी एक गुंतवणूक म्हणून करत आहोत व यावर आपल्या भविष्यातील अर्थनियोजन अवलंबून आहे ही गोष्ट नक्कीच विचारात घेऊन ती खरेदी करणं गरजेचं ठरतंय.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)