चोरटयांनी केला 6 लाख 71 हजारांचा मुद्देमाल लंपास

नागठाणे : काशीळ (ता.सातारा) येथे गुलाब महंमद मेहबूब भालदार या सेवा निवृत्त मंडल अधिकाऱ्याच्या बंद घराचा कडी कोयांडा अज्ञातांनी उचकटून बेडरूम मधील कपाटे फोडून 17 तोळे सोन्याचे दागिने 6 हजार रुपये किमतीचे दागिने व रोख 4 लाख असा सुमारे 6 लाख 71 हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली.

गुलाब महमंद भालदार हे पत्नीसह मुंबई स्थित आपल्या मुलास भेटण्यास शुक्रवारी गेले होते या दरम्यान अज्ञात चोरट्याने ही घरफोडी केली. घटना स्थळी ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. उप विभागगीय पोलीस अधिकारी समीर शेख,स.पो.नि चंद्रकांत माळी व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पहाणी केली पुढील तपास पी.एस.आय.प्रकाश राठोड करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)