केपटाऊन – कर्णधार हरमनप्रीत कौरची अर्धशतकी खेळी, तसेच जेमिमा रॉड्रीक्स, दीप्ती शर्मा व स्नेह राणा यांनी केलेल्या अफलातून प्रतिकारानंतरही महिला टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून अवघ्या 5 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघाचे यंदाच्या स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले आहे.
That’s that from our semi-final game.
Australia win by 5 runs.
Scorecard – https://t.co/fVVsNjFbjU #INDvAUS #T20WorldCup pic.twitter.com/lq17aY6L9W
— BCCI Women (@BCCIWomen) February 23, 2023
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 173 धावांता पाठलाग करताना भारतीय महिला संघाचा डाव 20 षटकांत 8 बाद 167 असा रोखला गेला. सलामीवीर स्टार फलंदाज स्मृती मानधना व शफाली वर्मा यांनी साफ निराशा केली. त्यानंतर यस्तिका भाटीयाही अपयशी ठरल्याने भारताची 3 बाद 28 अशी बिकट स्थिती बनली होती. त्यानंतर जेमिमा व कर्णधार हरमनप्रीत यांनी डाव सावरताना जिद्दी फलंदाजी केली. मात्र, जेमिमा 43 धावांवर बाद झाली. तीने 24 चेंडूत 6 चौकार फटकावले. रिचा घोषने 14 धावांवर बाद होत निराशा केली.
लक्षवेधी
– भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना साफ अपयशी
– शफाली वर्मा व यस्तिका भाटीयाकडूनही निराशा
– लेनिंग व मुनीच्या खेळीने ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
– अखेरच्या 23 चेंडूत ऑस्ट्रेलियाने फटकावल्या 98 धावा
– भारताचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले
– उपांत्य लढतीततील पराभवाची परंपरा कायम
– पुन्हा ऑस्ट्रेलियाकडूनच पराभव
– हरमन व जेमिमाची खेळी ठरली व्यर्थ
– दीप्ती व स्नेहची जिद्दी खेळी अपयशी
दरम्यान हरमनने दमदार अर्धशतक साकार केले. मात्र, त्यानंतर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती धावबाद झाली. तीने 52 धावांच्या खेळीत 34 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार फटकावला. तळात दीप्ती शर्मा व स्नेह राणा यांनी चांगला प्रतिकार केला. स्नेह 11 धावांवर बाद झाली तर पाठोपाठ राधा यादवही परतली. अखेरच्या षटकांत दीप्तीने विजयासाठी निकराचे प्रयत्न केले. अखेर भारताला अवघ्या 5 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाकडून डार्सी ब्राऊन व ऍश्ले गार्डनर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. जेस जॉन्सन व मेघन शल्ट यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंगने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर एलिसा हिलीने बेथ मुनीसह संघाला अर्धशतकी सलामी दिली. हिली स्थिरावल्यावरही राधा यादवच्या गोलंदाजीवर पुढे सरसावत मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात 25 धावांवर यष्टीचीत बाद झाली. तीने 26 चेंडूत 3 चौकार फटकावले. मुनीने आपले अर्धशतक थाटात साकार केले. मात्र, तीलाही उंचावरून फटका मारण्याचा मोह आवरता आला नाही.
तीने 54 धावांच्या खेळीत 37 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 1 षटकार अशी फटकेबाजी केली. त्यावेळी कर्णधार मेग लेनिंग संयमी फलंदाजी करत होती. तीने ऍश्ले गार्डनरच्या साथीत संघाचे शतक फलकावर लावले व फलंदाजी करण्याचा गिअर बदलला. तीला गार्डनरनेही सुरेख साथ दिली. गार्डनर 31 धावांवर बाद झाली. तीने या खेळीत 18 चेंडूत 5 चौकार फटकावले. लेनिंगने संघाला दीडशतकी धावांच्या पुढे मजल मारुन दिली.
BCCI : “तुमच्या जागी मी असतो तर राहुलची…” के. श्रीकांत यांचा निवड समितीवर संताप
ग्रेस हॅरिसने साफ निराशा केली. ती 7 धावांवर बाद झाली. लेनिंगने नाबाद 49 धावांची खेळी करताना 34 चंडूत 4 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी केली. एलिस पेरीने नाबाद 2 धावा केल्या ऑस्ट्रेलिया महिला संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 172 धावा केल्या. भारतीय महिला संघाच्या शिखा पांडेने 2 बळी घेतले. दीप्ती शर्मा व राधा यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया महिला संघ – 20 षटकांत 4 बाद 172 धावा. (ऍश्ले गार्डनर 31, एलिसा हिली 25, बेथ मुनी 54, मेग लेनिंग नाबाद 49, एलिस पेरी नाबाद 2, शिखा पांडे 2-32, दीप्ती शर्मा 1-30, राधा यादव 1-35).
भारतीय महिला संघ – 20 षटकांत 6 बाद 167 धावा. (हरमनप्रीत कौर 52, जेमिमा रॉड्रीक्स 43, दीप्ती शर्मा नाबाद 20, डार्सी ब्राऊन 2-18, ऍश्ले गार्डनर 2-37).