“हासुद्धा तिरंग्याचा अपमानच”

शिवसेनेनं घेतला मोदी सरकारचा खरपूस समाचार

नवी दिल्ली   – दिल्लीच्या सीमांवर आंदोलक शेतकऱ्यांची सरकारकडून मोठीच नाकेबंदी करण्यात आली आहे. सीमा भागातील रस्ते कॉंक्रिटचे पक्‍के अडथळे उभारून बंद करण्यात आले असून तारांचे कुंपण उभारून तसेच रस्त्यांवर खिळे ठोकून त्यामार्गावर एकही वाहन येणार नाही अशी दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे आंदोलकांना बाहेर पडणे किंवा नवीन आंदोलक धरण्याच्या ठिकाणी येण्यास मज्जाव केला जात असून त्यातच सीमेवरील पोलीस फौज फाटा आणखी वाढवण्यात आला आहे.

तर दुसरीकडे  प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण  लागलेले दिसून आले.  लाल किल्ल्यावर शेतकऱ्याच्या एका गटाने गोंधळ घातला होता. त्यात जो तिरंग्याचा अपमान झाला त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत दुःख व्यक्त केले होते.  आता याच मुद्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

काय आहे सामनाचा अग्रलेख

श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली होती. त्याचे सारथ्य करणारे नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत. अतिरेक्यांच्या गोळ्यांची, बॉम्बची पर्वा न करता श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकविणारे नरेंद्र मोदीच होते. तिरंग्याविषयीच्या त्यांच्या भावना ज्वलंत आहेत. त्यामुळे मोदी यांच्या भावना या महत्त्वाच्या आहेत. मूळ मुद्दा इतकाच की, लाल किल्ल्यावर तिरंग्याचा तथाकथित अपमान करणाऱ्यांचे धागेदोरे नक्की कोठपर्यंत पोहोचले आहेत ते समोर आणा. दुसरे असे की, न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हासुद्धा तिरंग्याचा अपमान आहे. पण बोलायचे कोणी?

लाल किल्ल्यावर शेतकऱयांच्या एका गटाने गोंधळ घातला. त्यात जो तिरंग्याचा अपमान झाला त्यामुळे आपले प्रिय पंतप्रधान मोदी अत्यंत दुःखी झाले आहेत. ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी त्यांचे मन मोकळे केले. ’26 जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान झाला. त्यामुळे देश दुःखी झाला’, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधानांचे असे म्हणणे असेल तर ते योग्यच आहे. देशातल्या सवाशे कोटी नागरिकांच्या भावना याच आहेत. तिरंग्याचा सन्मान हाच राष्ट्राचा सन्मान असतो. सीमेवर तैनात सुरक्षा दलाचे बजेट या वर्षी 7.1 टक्क्यांनी वाढवले आहे. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, हिंदुस्थान-तिबेट सीमा पोलीस दलासाठी नव्या अर्थसंकल्पात 1 लाख तीन हजार 803.52 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली, ती फक्त तिरंग्याचा सन्मान करण्यासाठीच. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पंतप्रधानपदावर कोणीही विराजमान असो, तिरंग्याचे रक्षण करणे हे त्याचे प्रथम कर्तव्य ठरते. म्हणूनच मोदी यांच्या भावना त्यादृष्टीने महत्त्वाच्या आहेत. पण 26 जानेवारीस म्हणजे प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाचा जो राजकीय धुरळा उडवला जात आहे तो कितपत योग्य आहे? साठ दिवसांपासून आंदोलन करणाऱया शेतकऱयांचा एक गट त्या दिवशी लाल किल्ल्यावर घुसला. त्यांनी हडकंप माजवला. त्यात तिरंग्याचा अपमान झाल्याचा प्रचार भाजप सायबर फौजांनी केला. तो अपप्रचारच ठरला. जे चित्रीकरण समोर आले त्यात तिरंग्याचा अपमान वगैरे झाल्याचे कुठेच दिसत नाही. तिरंगा लाल किल्ल्यावर डौलाने फडकतच होता, पण शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचले हे उघड झाले. तिरंगा आम्हाला ‘जान से प्यारा’ आहे. भाजपच्या सायबर टोळधाडीस तिरंगा जितका प्यारा आहे त्यापेक्षा जास्त तो गाझीपूरच्या आंदोलक शेतकऱयांना प्यारा आहे.

तिरंगा अपमानित करून

कोणतेही आंदोलन चालणार नाही. प्रश्न इतकाच आहे, जो अपमान झालाय असे दिसत नाही त्यावर पंतप्रधानांनी इतके व्यथित का व्हावे किंवा सत्ताधारी पक्षाने इतकी आदळआपट का करावी? पंतप्रधान मोदी यांच्या भावना देशाला समजल्या आहेत व आता आंदोलक शेतकऱयांचे म्हणणे ऐकून घ्या, इतकेच मागणे आहे. शेतकऱयांच्या मुळावर आलेले तीन कृषी कायदे रद्द करा व तिरंग्याचाच मान राखा असे सांगणे व त्यासाठी आंदोलन करणे हा गुन्हा नाही! हातात व ट्रक्टरवर तिरंगा लावूनच शेतकरी त्यांच्या प्रश्नांसाठी लढतो आहे. शेतकऱयांना रस्त्यावर तडफडून मरू देणे हा तर तिरंग्याचा भयंकर अपमान आहे. तिरंग्याच्या रक्षणासाठी जवानांची फौज सीमेवर प्राणांची बाजी लावत आहे. त्यात पंजाबच्या शेतकऱयांची पोरे मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यांचे बळी घेऊन तिरंग्याचा काय सन्मान राखणार आहात? निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थसंकल्पाच्या हृदयात गाव आणि शेतकरी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. हे टाळीचे वाक्य आहे, पण गाझीपूर सीमेवर आंदोलन करणारे लाखो शेतकरी तुमच्या मनमंदिरात आहेत की नाहीत? शेतकऱयांची लढाई स्वाभिमानाची आहे. तिरंगा हा स्वाभिमान आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक आहे हे खरेच, पण शेतकऱयांना पोलिसी दंडुक्याने चिरडणे हा तिरंग्याचा अपमान आहे हेदेखील तेवढेच खरे. सरकारला तिरंग्याच्या अपमानाची चिंता वाटणे ही गर्वाचीच गोष्ट आहे. पण तिरंग्याचा तथाकथित अपमान फक्त आंदोलक शेतकऱयांनीच केला आहे काय? शेतकऱयांचे आंदोलन संपविण्यासाठी पोलिसांच्या सशस्त्र फौजा उभ्या केल्या गेल्या आहेत. लोखंडी कठडे उभे करण्यात आले आहेत. डांबरी रस्त्यांवर खिळे मारून ठेवले आहेत. शेतकऱयांनी दिल्लीत पुन्हा येऊ नये म्हणून काय हा कडेकोट बंदोबस्त! हे सर्व कठोर प्रयोग

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.