Rozlyn Khan Slams Hina Khan | ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून अभिनेत्री हिना खानला मोठी लोकप्रियता मिळाली. सध्या ती ब्रेस्ट कॅन्सर सारख्या आजाराशी लढा देत आहे. याबाबतची हेल्थ अपडेट सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र या कठीण परिस्थितीचा देखील ती मोठ्या हिमतीने सामना करते. याबद्दल तिचे कलाकरांसह चाहत्यांकडून देखील कौतुक केले जाते. मात्र रोजलीन खानने हा सगळा पीआर स्टंट असल्याचे म्हणत हिना खानवर टीका केली आहे.
रोजलीन खानची पोस्ट-
रोजलीनने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले की, ‘एका महिलेसाठी सर्वांत मोठं दु:ख म्हणजे किमोथेरपीमुळे केस गमावणं. ही गोष्ट तुम्ही नॉर्मल करू शकता का? प्राणी संग्रहालयातील सिंहीण हिंमत दाखवू शकते का? ती तिसऱ्या स्टेजच्या उपचाराविषयी दोन ओळी तरी सांगू शकते का? की तिने फक्त प्रकाशझोतात राहण्यासाठी कॅन्सरचा उपयोग केला आहे?,’ असा सवालही रोजलीनने केला आहे.
‘गैरसमज पसरवण्यासाठी केलेली ही अत्यंत दयनीय आणि लज्जास्पद कृती आहे. कारण हेडलाइन्समध्ये राहण्यासाठी कॅन्सरचा वापर करणाऱ्या काही जणांना आणि तुला ही गोष्ट माहीत आहे की मेडिकल गैरसमज पसरवण्यासाठी भारतात काही शिक्षा नाही. सोनाली बेंद्रे, लिसा, मनिषा कोईराला यांसारख्या काही सजग अभिनेत्रींनी कधीच इतकी खालची पातळी गाठून लोकांची दिशाभूल केली नव्हती,’ असेही तिने म्हंटले आहे.
रोजलीनने आणखी एका पोस्टमध्ये लिहिले की, ‘जीवघेण्या आव्हानांना तोंड देणाऱ्या लोकांप्रती तुमची काही सामाजिक जबाबदारी आहे का की तुम्हाला फक्त तुमच्या व्यावसायिक उद्दिष्टांसाठी कॅन्सरचा वापर करायचा आहे? ती तिच्या कॅन्सरच्या टप्प्याबद्दल योग्य माहिती देत आहे का, याबद्दलची मला खात्री नाही. ती कधी एमआरएम आणि रेडिएशनच्या तिसऱ्या टप्प्यातील रुग्ण असल्याबद्दल बोलली आहे का?
मी अशा मानसिक आजारी लोकांसाठी फक्त प्रार्थना करू शकते, जे कॅन्सरने ग्रस्त आहेत आणि त्याचा वापर पब्लिसिटी स्टंट म्हणून करत आहेत. चला, कॅन्सर झाला, बातमी आहे, चला ती बातमी बनवूया.’ सध्या रोजलीनची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. यावर आता हिना खान काय प्रतिक्रिया देणार हे पाहावे लागणार आहे.
हिना खानचे रॅम्प वॉकचे फोटो व्हायरल
दरम्यान, २८ जूनला हीना खानने तिच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर तिला कर्करोगाचे निदान झाल्याचे एक पोस्ट शेअर करीत सांगितले होते. मात्र या आजाराशी झुंज देतानाही ती आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करताना दिसली. तिचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
हिना खान ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेनंतर ‘बिग बॉस’च्या ११ व्या सीझनमध्ये दिसली होती. यात ती टॉप २ मध्ये पोहोचली होती. ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये देखील ती सहभागी झाली होती.
हेही वाचा:
UPI पेमेंट करत असाल तर रहा सावध; काय आहे जंप्ड डिपॉझिट स्कॅम? एका चुकीमुळे होऊ शकता कंगाल