मुंबई : राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा वरून राजकारण सुरु झाले आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना विरोधी बाकावरील नेत्यानावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले,आम्हाला लढण्याचं प्रशिक्षण देण्याची गरज नाही आणि लढण्यासाठी आम्हाला भाडोत्री लोक देखील लागत नाहीत.’ असं म्हणत राऊत यांनी भाजप पक्ष आणि राज राज ठाकरेंवर टीका केली. यावर आता भाजप नेते राम सातपुते यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. “आम्हाला हिंदुत्व भाड्याने घ्यावे लागत नाही इति खा.संजय राऊत. मात्र सध्या अख्खा शिवसेना पक्षच राष्ट्रवादीला भाड्याने दिलाय ते पण सांगा की…”, असा टोला सातपुते यांनी लगावला आहे.
काय म्हणाले राम सातपुते
आम्हाला हिंदुत्व भाड्याने घ्यावे लागत नाही
– खा.संजय राऊत
सध्या अख्खा शिवसेना पक्षच राष्ट्रवादी ला भाड्याने दिलाय ते पण सांगा की .@rautsanjay61 @Dev_Fadnavis @OfficeofUT— Ram Satpute (@RamVSatpute) April 30, 2022