करोनाचा धसका! इटलीत अंशत: लॉकडाऊन जारी

मिलान – इटलीत पुन्हा करोना प्रादुर्भावाची समस्या उग्र होत असल्याने तेथे ख्रिसमस सुट्टीच्या काळाकरीता अंशत: लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. नाताळीच्या सुट्टीचा आनंद उपभोगण्यासाठी अनेक नागरिक पुन्हा आपल्या मित्र व कुटुंबीयांसमवेत सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन उत्सव करण्याची शक्‍यता आहे.

त्यातून पुन्हा करोनाच्या प्रसाराचा धोका वाढण्याची शक्‍यता असल्याने ही उपाययोजना करण्यात आली आहे. हे निर्बंध 21 डिसेंबर ते 6 जानेवारी या काळात लागू राहणार आहेत. या काळात दोनपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. हा निर्णय वेदनादायी आहे पण आमचा नाईलाज आहे असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की व्यापक उपाययोजना करूनही करोनाचा आलेख काही खाली येताना दिसत नाही उलट ख्रिसमच्या गर्दीच्या काळात तो अधिक उंचावण्याचा धोका आम्हाला स्पष्ट दिसत असल्याने आम्हाला हे निर्बंध लागू करावे लागत आहेत.

करोनाचे सर्वाधिक बळी इटलीत नोंदवले गेले आहेत. तेथे आतापर्यंत करोनामुळे 67900 लोक मरण पावले आहेत. इटलीत येत्या 27 डिसेंबरपासून लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होत आहे. त्यातून हे दुष्टच्रक थांबेल अशी अधिकाऱ्यांना आशा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.