रियाद (सौदी अरेबिया) : लाजियो फुटबाॅल संघाने जुवेंटसचा ३-१ ने एकतर्फी पराभव करत पाचव्यांदा इटालियन सुपर कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. पोर्तूगालचा स्टार फुटबाॅल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो या सामन्यात खास कामगिरी करू शकला नाही आणि जुवेंटसला अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.
It was a pleasure to host the Italian Super Cup 🇮🇹 in Saudi Arabia 🇸🇦 for the second time in a row.
An astonishing match! Congratulations to S.S. Lazio on a great game and for winning the cup pic.twitter.com/liHLutIYek— عبدالعزيز بن تركي الفيصل (@AbdulazizTF) December 22, 2019
लाजियो संघाकडून लुईस अल्बर्टोने १६ व्या मिनिटाला, सेनादने ७३ व्या मिनिटाला तर दानिलो याने अतिरिक्त वेळेत (९०+४) प्रत्येकी एक-एक गोल केला. सीरी ए फुटबाॅल स्पर्धा विजेत्या जुवेंटस संघाकडून पाउलो याने ४५ व्या मिनिटाला एकमेव गोल केला.