पुणे -बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये येत्या सोमवारी (दि.27)
आणि मंगळवारी (दि.28) मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्याने गुलाब चक्रीवादळाची निर्मिती झाली.
हे चक्रीवादळ रविवारी दुपारी ओडिशाच्या गोपाळपूरपासून आग्नेयेकडे 140 किलोमीटर, तर आंध्र प्रदेशच्या कलिंगापट्टणम्पासून ईशान्येकडे 190 किलोमीटर समुद्रात होते.